1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (16:13 IST)

सिन्नर तालुक्यातील गावांचा पाणीप्रश्न सुटणार

सिन्नर तालुक्यातील गाव समूहांच्या प्रादेशिक नळ योजनेचा समावेश असलेल्या मनेगाव व बावीस गावे आणि बारागाव पिंप्री व सहा गावे पाणीपुरवठा योजनांसाठी गुडन्यूज आहे. सतत खंडित होणाऱ्या वीजेचा प्रश्न आता निकाली निघाला आहे. यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. गाव शिवारात सोलर उर्जा प्रकल्प उभारण्याच्या २१ कोटी रुपयांच्या प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे आता बारागाव पिंपरी व सहा गावे तसेच मनेगाव व बावीस गावे पाणी पुरवठा योजना अखंडित सुरू राहू शकतील. तशी माहिती खा. हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
 
सिन्नर तालुक्यातील मनेगावसह तेवीस गाव पाणीपुरवठा योजना , बारागाव पिंप्रीसह सात गाव पाणीपुरवठा योजना, ठाणगावसह सहा गाव पाणीपुरवठा योजना, वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना, मिठसागरे पंचाळेसह बारा गाव पाणीपुरवठा योजना, नायगावसह दहा गाव पाणीपुरवठा योजना, कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना या गावाच्या समुहांचा प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेत समावेश झालेला आहे.वीज मंडळाकडून येणारे अव्वाच्यासव्वा वीजबिले आणि पाणीपट्टी पोटी प्रत्यक्ष जमा होणारी रक्कम यामध्ये खुपच तफावत असते. यामुळे विजबिले भरली जात नाहीत. यातूनच वीजमंडळाकडून पाणीपुरवठा योजनेचा विद्युतपुरवठा खंडित होतो. या विषयी गावक-यांकडून आलेल्या तकारींची दखल घेत खा.गोडसे यांनी नाशिक येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला विशेष पत्र धाडूनपाणी पुरवठा योजनेच्या वीजबिलावर पर्याय म्हणून गावशिवारातील जागेवर सोलर प्लांट उभारण्याच्या सुचना प्राधिकरणाला केल्या होत्या .
 
खा.गोडसे यांच्या सोलर प्लांट उभारण्याविषयीच्या सुचनांची दखल घेत प्राधिकरणाने लगेचच प्रत्यक्ष कार्यवाही करण्यास सुरूवात करून मनेगाव व बारागाव पिंप्री येथील पाणीपुरवठा समितीकडून सोलर प्लांट उभारण्याच्या जागेसंदर्भातील प्रस्तावाची मागणी केली होती. गावसमुहांकडून आलेल्या मागणी प्रस्तावाच्या आधारावर गावशिवारात सोलर प्लांट उभारणीकामी प्राधिकरणाने सविस्तर अहवाल तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी सदर प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.