जनतेची जी मागणी आहे तीच आम्ही पूर्ण करतोय : मुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधकांसमोर देवेंद्र और हम साथ साथ, मेरा भी नाम एकनाथ है, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र और हम साथ साथ, मेरा भी नाम एकनाथ है, मी सक्षम नसतो तर एवढा मोठा कार्यक्रम केला असता का?, आमचा स्वत:चा अजेंडा नाही. जनतेची जी मागणी आहे तीच आम्ही पूर्ण करतोय. राज्यातील ९ हजार ग्रामपंचायतींनी सरपंच थेट जनतेतून निवडा असा ठराव केला होता. आमचे सरकार अल्पमतात गेले त्याचे पत्र पाठवलं त्यानंतर मविआ सरकारने ४०० जीआर काढले मग ते थांबवणार का नाही, असा सवाल एकनाथ शिंदेंनी विरोधकांना विचारला आहे.