शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (08:39 IST)

लोकांची दिशाभूल करू नका, दिल्ली उच्च न्यायालयाने रामदेव बाबांना फटकारलं

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान योगगुरू रामदेव बाबा यांनी कोरोना बरा करण्याचा दावा करत कोरोनील औषधाची निर्मिती केली होती.
 
पण याच मुद्द्यावरून दिल्ली उच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांना फटकारलं आहे.
 
अ‍ॅलोपॅथी आणि कोविड-19 च्या उपचारांबाबत योगगुरू बाबा रामदेव यांनी जनतेची दिशाभूल करू नये. तुमचे अनुयायी, शिष्य आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार्‍या लोकांचे स्वागत आहे. मात्र अधिकृत काहीही कोणाचीही दिशाभूल करू नये, असं उच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांना सुनावलं.
 
कोरोना काळात कोरोनीलच्या उद्घाटनप्रसंगी तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे देखील होते. त्या काळात रामदेव बाबा यांनी ऍलोपॅथी उपचारांवर टीका केली होती. त्यानंतर वरील वाद समोर आला होता.