1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. We dont break into anyones house says devendra fadnavis

आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही

आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. परिवारावर येऊ नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी फडणीस यांना दिला होता. त्याला फडणवीस यांनी ट्वीट करुन उत्तर दिले.
 
तुमचे हिंदुत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करून जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार आहेत.  तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या… बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते, असा टोला फडणवीस यांनी ट्वीट करुन ठाकरे यांना लगावला. मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे. ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचा भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत. कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका, असा इशारा फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
 
फडणवीस यांनी ट्वीटमधून उद्धव ठाकरे यांना सल्लाही दिला आहे. चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर मी सांगतो त्या गोष्टींवर काढा. सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले, मुंबईला कुणी लुटले, मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले, मराठी माणसाला कुणी ओरबाडले, 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते, याची चिंता तुम्ही करा आणि त्यावरच पुस्तक काढा, असा सल्ला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
पुढील लेख
जयंत पाटील यांच्याशी संबंधित राजारामबापू सहकारी बॅंकेवर सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापा