रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 24 जून 2023 (12:46 IST)

अभिनेता राम चरणने दाखवली मुलीची पहिली झलक! चाहत्यांचे आभार मानले

social media
चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रामचरण आणि त्यांची पत्नी उपासना हिने लग्नाच्या 11 वर्षांनंतर एका मुलीला जन्म दिला आहे.ही माहिती समोर आल्यापासून रामचरणचे चाहते त्यांच्या मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी आतुर दिसत आहेत. विशेष म्हणजे, उपासनाने 20 जून रोजी हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात मुलीला जन्म दिला. कलाकाराने सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना मुलीच्या जन्माची माहिती दिली.
 
शुक्रवारी दुपारी राम चरण आणि उपासना पहिल्यांदाच हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलबाहेर त्यांच्या नवजात मुलीसोबत एकत्र दिसले. त्याचबरोबर त्याने चाहत्यांचे आभारही मानले आणि पापाराझीसोबतचे फोटोही काढले, पती-पत्नी दोघांचे हे छायाचित्र समोर आले आहे, ज्यामध्ये रामचरण मुलीला कडेवर घेऊन पत्नीला रुग्णालयातून घरी घेऊन जाताना दिसत आहे,
 
पती-पत्नी दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळंच हसू पाहायला मिळालं.सोशल मीडियावर हे फोटो समोर आल्यापासून खूप व्हायरल होत आहेत.मुलीचे आई-वडील झाल्यापासून दोघेही पती-पत्नी खूप आनंदी दिसत आहेत. साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्द्ध  अभिनेता रामचरण त्याच्या व्यक्तिमत्त्वासोबतच त्याच्या अभिनयासाठीही ओळखला जातो.
 
 पण त्याचे कुटुंब नवजात मुलास भेटताना नक्कीच दिसले, ज्यामध्ये सुपरस्टार चिरंजीवी आणि पुष्पा अल्लू अर्जुन दिसले. त्याच वेळी, रुग्णालयातून घरी जात असताना, हे जोडपे त्यांच्या मुलीसोबत स्पॉट झाले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर चाहते या जोडप्याला भरभरून प्रेम देत आहेत. वडील झाल्यानंतर तो आपल्या प्रियजनांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे, असे चित्र यावेळेस समोर आले आहे. त्यात रामचरण आणि उपासना यांची मुलगी दिसत नाही. पण हे चित्र बघूनच चाहते खूप खूश आहेत.
 
Edited by - Priya Dixit