1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2023 (23:29 IST)

Weather Updates : राज्यातील काही भागात गारपिटीची शक्यता

Weather Updates   Chance of hailstorm in some parts of the state
सध्या तापमानाच्या चढउतार सुरु आहे.राज्यात काही ठिकाणी उन्हात तेजी असल्यामुळे उकाडा चांगलाच वाढला आहे. हवामान खात्यानं राज्यात पश्चिमी विदर्भात गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. पश्चिमी हिमालयाजवळ पश्चिमी विक्षोभ सक्रिय होऊन पूर्व दिशेकडे वाटचाल करत असून हवेच्या खालच्या थरात चक्राकार वारे वाहत आहे. येत्या  पुढील दोन दिवसात पुन्हा तापमानात घट होणार आहे. 14 ते 15 मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली असून शेतकऱ्यांना पावसामुळे पिकाचे नुकसान होण्याची  शक्यता वर्तवली  आहे . अमरावतीच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली  आहे. 
 
Edited By - Priya Dixit