शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2023 (22:07 IST)

आरोग्य विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण निवडणूकीकरीता 42 मतदान केंद्र

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण निवडणूकीकरीता राज्यभरात एकूण 42 मतदानकेंद्र निर्देशित करण्यात आली आहेत.याबाबत विद्यापीठाचे  निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यासमंडळे आदी प्राधिकरणासाठी राज्यात दि. 17 मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. याकरीता राज्यातील 42 ठिकाणी मतदान केंद्र निर्देशित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
मुंबई क्षेत्रात भायखळा येथील कॉलेज ऑफ नर्सिंग जे.जे. हॉस्पीटल, सेठ जी.एस. कॉलेज के.ई.एम. हॉस्पीटल, परळ, सायन येथील लोकमान्य टिळक मेडिकल हॉस्पिटल, ठाणे येथील आर.जी.एम.सी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नवी मुंबई खारघर येथील वाय.एम.टी. कॉलेज, रत्नागिरी चिपळूण येथील बी.के.एल. वाळवळकर रुरल मेडिकल कॉलेज, खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे योगिता डेंटल कॉलेज, अलिबाग येथील चंद्रकांत हरी केळुसकर होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, सावंतवाडी येथील आर.जे.व्ही.एस. भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय, तसेच पुणे येथील आर्मड् फोर्स मेडिकल कॉलेज, बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून हॉस्पिटल, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, निगडी येथील पी.डी.ई.एस.चे कॉलेज ऑफ आयुर्वेद अॅण्ड रिसर्च संेटर, मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथील एस.सी. मुथा आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
 
कोल्हापूर येथे सी.जे.पी.ई.एस. चे होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज, सोलापूर येथील डॉ. वंश्यपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज, नाशिक येथील ए.एस.एस. आयुर्वेद महाविद्यालय, डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल, सर डॉ. एम.एस. गोसावी इन्स्टीटयुट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, धुळे येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, अहमदनगर येथील अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल, सॅंत लुक हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग, संगमनेर येथील एस.एम.बी.टी. डेंटल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल, औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालय आणि हॉस्पिटल, जालना येथील जे.आय.आय.यु. इंडियन इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल कॉलेज अॅण्ड रिसर्च, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथील पी.डी. जैन होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.
 
लातूर येथे विद्यापीठाचे विभागीय केंद्र विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुरल गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज, सेवाग्राम-वर्धा येथील महात्मा गांधी इंन्स्टिटयुट ऑफ मेडिकल कॉलेज सायन्सेस, चंद्रपूर येथील श्रीमती विमलादेवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल, नागपूर येथील भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय, एन.के.पी.साळवे इंन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च संेटर, अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग इन्स्टिटयुट, अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथील डी.एम.एम. आयुर्वेद महाविद्यालय, बुलढाणा येथील आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे आयुर्वेद महाविद्यालय आणि हॉस्पिटल, वाशिम येथील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आयुर्वेदिक महाविद्यालय, गोंदिया येथील महादेवराव शिवणकर आयुर्वेद महाविद्यालय येथे मतदान घेण्यात येणार आहे. विद्यापीठातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकीकरीता वरील मतदान केंद्रांची संबंधितांनी नोंद घ्यावी असे विद्यापीठाकडून सूचित करण्यात येत आहे.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor