1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2023 (21:23 IST)

म्हात्रेंचा ‘तो’ VIDEO प्रकाश सुर्वेंच्या मुलानेच…”, वरुण सरदेसाई यांचं विधान

varun desai
आमदार प्रकाश सुर्वे आणि नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शीतल म्हात्रे या आमदार प्रकाश सुर्वे यांच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडीओ मॉर्फ केल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे.
 
या संपूर्ण प्रकरणावर आता युवासेनेचे (ठाकरे गट) नेते वरूण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा कथित व्हिडीओ प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांनी बनवला आहे. त्यांनीच हा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजवर लाइव्ह केला होता. त्यामुळे मुख्य आरोपी म्हणून राज सुर्वे यांना पोलीस अटक करतील, असं विधान वरुण सरदेसाई यांनी केलं. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor