गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 जुलै 2022 (09:01 IST)

टाळणेकामी नेवासा खुर्द येथील आठवडे बाजार बंद

market open
आषाढी वदय कामिका एकादशी व नेवासा आठवडे बाजार‌ रविवार, २४ जूलै २०२२ रोजी आहे. आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेलेले वारकरी परतीच्या मार्गावर नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येतात. यामुळे अंदाजे ७ लाख भाविकांची गर्दी शहरात होत असते.
 
म्हणून मोठया प्रमाणावर होणारी अनावश्यक गर्दी टाळणेकामी नेवासा खुर्द येथील आठवडे बाजार रविवार,२४ जूलै २०२२ रोजी बंद ठेवण्यात येत आहेत. असे आदेश अहमदनगर उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जून यांनी जारी केले आहेत.
 
आषाढी वदय कामिका एकादशी व आठवडे बाजार २४ जूलै‌ २०२२ एकाच दिवशी असल्यामुळे शहरात मोठया प्रमाणावर अनावश्यक गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
म्हणून मोठया प्रमाणावर होणारी अनावश्यक गर्दी टाळणेकामी मार्केट अँड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 3, 4 व 5 मधील तरतुदी अन्वये नेवासा तालुक्यातील नेवासा खुर्द, ता. नेवासा येथील २४ जूलै २०२२ रोजीचा आठवडे बाजार बंद ठेवणेबाबत आदेश उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जून यांनी पारित केले आहेत.