शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (09:21 IST)

एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

went to a well to cut flowers three of the same family were electrocuted fell into the well and died
विजेचा शॉक लागून एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला. या घटकराडमधील तासवडे येथील शिंदे वस्तीमध्ये ही दुर्घटना घडली. मृतक हे शिंदे कुटुंबातील आहेत. हिंदुराव शिंदे यांच्यासह सीमा शिंदे व शुभम शिंदे यांचा यात जीव गेला. एकाच कुटुंबातील तिघेही अचानक गेल्यानं शिंदे कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती तळबीड पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. विहिरीवरील विजेच्या धक्काने या तिघांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. पोलीस तपासानंतर तसेच शवविच्छेदन अहवालानंतर या तिघांच्या मृत्यूचे नेमकं कारण समोर येईल.
 
शिंदे कुटुंबातील हे तिघेजण फुले तोडण्यासाठी विहिरीवर गेले होते. विहिरीवरील विजेचा शॉक लागल्याने तिघेजण विहिरीत फेकले गेले. विहिरीतच त्यांचा मृत्यू झाला. तळबीड पोलीस अधिक तपास करत आहेत.