सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (07:48 IST)

पुण्याचे पालकमंत्री होणार फडणवीस म्हणाले…

devendra fadnavis
पुण्याचे पालकमंत्री होणार का ? आणि पुण्यातून निवडणूक लढविणार का, या दोन्ही प्रश्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही. लोकसभा निवडणूक लढवावी, अशी तुमची इच्छा आहे का, मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का, असा प्रतिप्रश्न त्यांनी माध्यमांना केला. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना भेटलो नसल्याचे सांगत त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
 
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार असून त्यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सध्या सुरू आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या फडणवीस यांना यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट उत्तर देताना सांगितले की, मी पुण्याला पालकमंत्री म्हणून येणार नाही, मी लोकसभा लढवावी अशी तुमची का इच्छा आहे, मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला होता.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भेट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती मात्र, आता या भेटीबाबत खुद्द देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाण यांच्यासोबत भेट झाल्यांच्या चर्चांना विराम दिला आहे. त्यांच्याशी अशी कुठलीही भेट झाली नाही असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले. तसेच मंत्री मंडळाच्या विस्तरा बाबत विचारले असता, मंत्री मंडळ विस्तार लवकरच होईल असेही ते म्हणाले.