शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (20:48 IST)

चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी नितीन गडकरींची अधिकाऱ्यांना डेडलाईन

nitin gadkari
Pune Chandani Chowk  : पुण्यातील चांदणी चौकच्या वाहतुकीचे मोठे प्रश्न आहे. चांदणीचौकच्या वाहतूक समस्ये,मुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असून त्यांनी वाहतुकीच्या त्रासाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असून निर्देशानुसार जिल्ह्यातील वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी सकाळी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतूकीची समस्या,वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. तसेच पुढील 15 दिवसांत परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या लेनचे काम त्वरीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतुकीचा आढावा घेतला आहे. 

त्यांनी महामार्ग आणि जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली आणि वाहतुकीसाठी  नागरिकांची गैरसोय होत आहे हे लक्षात घेता चांदणी चौक परिसरातील वाहतुकीचे काम जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देऊन त्यांनी अधिकाऱ्यांना डेडलाईन दिली आहे. त्यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, पुण्यातून इतर शहरांना जाणाऱ्या मार्गात कोणते बदल केले जाणार आहे हे देखील स्पष्ट केलं आहे. हे सर्व काम टाऊन प्लानींगच्या अनुसार केले जातील. तसेच पुणे-शिरूर नगर- औरंगाबाद मार्गावर तीन मजली उड्डाण पूल तयार होण्याची माहिती देखील त्यांनी दिली. 
चांदणी चौकातील पूल येत्या दोन-तीन दिवसात पाडण्यात येण्याची माहिती देखील त्यांनी दिली. तसेच या पुलाचे बांधकाम लवकर सुरु करण्यात येईल आणि हे पूल जून 2023 पर्यंत तयार झाल्यास चांदणी चौकातील नव्या पुलाचे उदघाटन करू असं ही ते म्हणाले. 
 
पुण्यात जमिनीपासून 100 फूट उंचीवरून उडणाऱ्या बसेसची योजना देखील या वेळी त्यांनी जाहीर केली. तसेच पुण्यात डबलडेकर बस सुरु करण्याचा विचार देखील असल्याची माहिती त्यांनी दिली. 
 
नितीन गडकरी यांनी चाकण एमआयडीसी पासून 27 किमी अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरात मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. पुणे शहराभोवती होणारा अभिर्भाव लक्षात घेता चाकण एमआयडीसीपासून 27 किमी अंतरावर असणाऱ्या पावलेवाडी येथे 180 हेक्टरममध्ये हे लॉजेस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्याचा करार देखील झाला आहे. त्यासाठी 2 लाख कोटींचे लॉजीस्टीक पार्कसाठी खर्च करणार असल्याचं देखील त्यांनी संगितलं.