शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 3 सप्टेंबर 2022 (07:43 IST)

पर्यावरणपूरक आणि किफायतशीर घरे ही काळाची गरज : पद्मश्री डॉ. जी. शंकर

नाशिक : देशात निवारा अर्थात घरांची मोठी कमतरता आहे. ही गरज ओळखून पर्यावरणपूरक आणि किफायतशीर घरे उभारण्यासाठी आजच्या आर्कीटेक्ट वर्गाने काम करायला हवे असे मत पद्मश्री डॉ. जी. शंकर, हॅबिटॅट टेक्नॉलॉजी ग्रुप, तिरुवनंतपुरम, केरळचे संस्थापक आणि अध्यक्ष यांनी व्यक्त केले. नाशिकचे प्रसिध्द आर्कीटेक्ट कै. विवेक पाटणकर यांच्या तिसऱ्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.  
 
यावेळी विद्यावर्धन ट्रस्टच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हार्मेंट अॅण्ड आर्किटेक्चर अर्थात आयडिया कॉलेजचे संचालक विजय सोहनी, प्राचार्या दर्शना देसाई, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटेरिअर डिझायनर्स (आयआयआयडी) च्या वैशाली प्रधान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्कीटेक्ट (आयआयए)चे रसिक बोथरा आणि आर्कीटेक्ट  अॅण्ड  इंजिनिअर असोसिएशन चे चारुदत्त नेरकर यांच्यासह शहरातील नामांकित आर्कीटेक्ट उपस्थित होते. 
 
व्याख्यानात बोलतांना जी. शंकर म्हणाले की, आर्किटेक्टजवळ तिसरा डोळा असतो. त्यामुळे तो एखाद्या गोष्टीकडे  अधिक कलात्मतेने बघतो  त्यातून सुंदर वास्तू उभी करतो. सोबतच वास्तू उभारणीतून आर्किटेक्ट विचारही व्यक्त करतो. नाशिक शहराचा विचार केला असता आर्कीटेक्चरची अनेक सुंदर उदाहरणे असून त्यामुळे शहरातला समृद्धी मिळाली आहे. 
 
शहरात आयडीया कॉलजचे असलेली वास्तूमध्ये देखील संस्कृती आणि आर्कीटेक्चर यांची सुंदर सांगड घातलेली दिसते असे म्हणत इमारतीचे कौतुक केले. यावेळी जी. शंकर यांनी उभारलेल्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करत त्यासोबत असलेल्या वेगेवेगळ्या कल्पनांची माहिती देखील दिली.
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी उपमहापौर गुरमित बग्गा यांनी  पाटणकरांच्या स्मृती जागवल्या. पाटणकर नेहमीच आठवणीत राहणारा मित्र असल्याचे सांगत तो बोलता बोलता सगळ्यांना आपलस करायचा असे सांगितले. संकटावर मात करून मार्ग काढण हेच त्याचं जगण्याचा सूत्र होत असे सांगितले. पाटणकरांनी साकारलेल्या  वास्तूनी नाशिकच्या वैभवात भर घातली असून त्या कायमच त्यांची आठवण सांगणार असेही भावूनपणे म्हणाले.