गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 जुलै 2022 (08:57 IST)

आमचं काय चुकलं की आमच्या पाठीत खंजीर खुपसला? - आदित्य ठाकरे

aditya thackeray
"ही नुसती गद्दारी नाही, तर त्यांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलाय," असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधलाय. नवी मुंबईतील मानखुर्दमध्ये झालेल्या निष्ठा यात्रेदरम्यान ते बोलत होते.
 
आमचं काय चुकलं की यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी या सभेत उपस्थित केला.
 
ते पुढे म्हणाले की, "माझ्या मनात राग नाही आणि कोणत्याच शिवसैनिकांच्या मनातही पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल राग नाही. मात्र, ज्या माणसाने यांना राजकीय ओळख दिली, त्यांच्या पाठीत यांनी खंजीर खुपसाला, याचं दुःख आहे."
 
"राज्यामध्ये हे 40 लोक कुठेही फिरले तरी गद्दार म्हणूनच फिरणार," असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.