काय म्हणता, महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार, शिरसाट यांचे विधान
Shirsats statement राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारांच्या बंडखोरीची घटना ताजी असताना महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. महाराष्ट्रात आणखी एक गट सत्तेत येईल. काँग्रेसचे १६ ते १७ आमदार संपर्कात आहेत, असं विधान शिरसाट यांनी केलं आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
आणखी एक सत्तेत येईल. काँग्रेसचे १६-१७ आमदार संपर्कात आहेत, असं बोललं जातंय, यामध्ये किती तथ्य आहे? असं विचारलं असता संजय शिरसाट म्हणाले, “काँग्रेस पक्ष फुटणार आहे, हे नक्की आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकर होणार आहे. त्यामध्ये शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदं दिली जातील, हेही तेवढंच सत्य आहे.
काँग्रेस कधी फुटतेय आणि ते कधी सत्तेत येतात? यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. पण काँग्रेस फुटणार आहे, हे नक्की आहे. काही काळानंतर काँग्रेसही आमच्याबरोबर दिसेल,” असंही शिरसाट म्हणाले.