1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जुलै 2023 (20:17 IST)

सहन करण्याची एक मर्यादा असते, ती मर्यादा तुटली की कुणी कुणाचं नसत : बच्चू कडू

bachhu kadu
Bachhu kadu प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी आपली नाराजी व्‍यक्‍त केली आहे. सहन करण्याची एक मर्यादा असते, ती मर्यादा तुटली की कुणी कुणाचं नसतं, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. ते माध्यमांशी  बोलत होते.
 
मंत्रीमंडळ विस्तार आणि शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीबद्दल विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “माझं मत असं आहे की, मी मंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला नव्हता. पण एकंदरीत जी राजकीय व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेत कोण कसं अडचणीत येतं, हे मी सांगितलं.”
 
शिंदे गटातील ८ ते १० आमदार नाराज असून त्यांच्याबरोबर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत संपर्कात करत आहेत. ते आमदार पुन्हा ठाकरे गटात जातील का? या प्रश्नावर बच्चू कडू यांनी सूचक विधान केलं आहे. वाट पाहण्याची आणि सहन करण्याची एक मर्यादा असते, ती मर्यादा तुटली की कुणी कुणाचं नसतं, असं विधान बच्चू कडू यांनी केलं. आमदार कडू म्हणाले, “शेवटी वाट पाहण्याची एक मर्यादा असते. किती वेळ थांबायचं आणि किती सहन करायचं याचीही एक मर्यादा असते. या मर्यादा तुटल्या तर कुणी कुणाचं नसतं.”