1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 19 मार्च 2023 (16:34 IST)

राज्यात पुन्हा सत्ता पलटणार?

राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार स्थापित झालं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा आणि शिंदे गटाला 48 जागा देणार असं वक्तव्य केल्यामुळे त्याच्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरून भाजप कडून तो व्हिडीओ काढण्यात आला आहे. बावनकुळे यांनी देखील या वक्तव्यावर आपले स्पष्टीकरण दिले आहेत.  या वर आता बच्चू कडू हे अमरावतीत असून त्यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, बावनकुळे यांचं वक्तव्य हे चुकून केलेलं असून युतीच अजून आमचे काहीच ठरले नाही युती करायची की नाही, कोणाला किती जागा देणार की देणार नाही असे काहीही आमचे ठरलेले नाही.शिंदे- फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. युतीच काय करायचे यावर येत्या काळात निर्णय घेण्यात येईल. राज्यात या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री बदलले आहेत येणाऱ्या वर्षात काय होईल हे सांगणे कठीण आहे. 
 
Edited By - Priya Dixit