1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 मार्च 2023 (15:13 IST)

नाशिकचा सुपूत्र अजित शेळकेला वीरमरण

Ajit Shelke son of Nashik
नाशिकच्या येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकच्या अजित गोरख शेळके या जवानाचा राजस्थानच्या गंगानगर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं. ते अवघे 29 वर्षाचे होते. ड्युटीवरून घरी  परततांना  युनिटमध्ये झालेल्या अपघातात ते जखमी होऊन त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,वडील , भाऊ, वाहिनी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव सोमवारी त्यांच्या गावी येवलाच्या मानोरी बुद्रुकला आणण्याची शक्यता आहे. 
देशासाठी कर्तव्य बजावताना वीर मरण आलेल्या अजित गोरख शेळकेच्या निधनाने अवघ्या नाशिक जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.   
Edited By - Priya Dixit