शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 मार्च 2023 (13:25 IST)

Weather News : राज्यात वादळी पावसाचा इशारा, या जिल्ह्यात यलो अलर्ट

Maharashtra Weather Update News : राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पावसासह गारपीट झाल्यामुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. येत्या तीन दिवस असेच वातावरण राहणार अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे हंगामातील पिके काढणीला आले असता पीक खराब झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. 
 
राज्यात मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा थैमान सुरु होता. अवकाळी पावसासह गारपीट सुरु असून पिकांचे नुकसान झाले आहे.
 
हवामान खात्यानं राज्यात पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला असून राज्यात मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात पावसाची दाट शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसेच राज्यात विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्र भागात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर अकोला, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात गारपीटांसह मुसळधार वादळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 

राज्यात अवकाळी पावसामुळे पिकाचं नुकसान झाले असून येत्या तीन दिवसात राज्यात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
 
Edited By - Priya Dixit