शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जुलै 2023 (20:12 IST)

अन्यथा आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे आहोत, प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

prakash ambedkar
Prakash Ambedkar warned महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्याबाबतचा पुढील 15 दिवसांत भूमिका स्पष्ट करा अन्यथा आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे आहोत, असा धमकी वजा इशारा वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. प्रकाश आंबेडकर  अकोल्यात होते.
 
वंचितला महाविकास आघाडीत घेणार ही नाही हे उद्धव ठाकरे यांनी ठरवायला हवं. त्यांच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत काही बोलणं झालं असेल तर ते सांगाव. न्यायालयनी लढाईत काय होईल याची वाट बघण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी भविष्याचा विचार करायला हवा. आमचा उद्धव ठाकरेंमुळे भ्रमनिरास झालेला नाही. पण त्यांनी वंचितबाबत निर्णय घ्यायला हवा, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
 
अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आणि राजकारणातले ‘रणछोडदास’ समोर आले आहेत. पेरलं ते उगवंल या शरद पवारांवरील आरोपांमध्ये तथ्य नाही. परिस्थितीनुसार राजकारणात निर्णय घ्यावे लागतात. चौकशीच्या फेरीत असलेले अजित पवारांसोबत गेले आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
 
जे ओठात, तेच पोटात, असा अजित पवारांचा स्वभाव आहे. शरद पवार यांच्याबाबत मी जे सातत्याने बोलत होतो तेच अजित पवार हे कालच्या भाषणात बोलले. अजित पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे माझे म्हणणे खरे ठरले आहे, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.