सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (08:10 IST)

जे घालवायला पाहिजे होतं ते आम्ही सहा महिन्यांपूर्वीच घालून टाकलं--एकनाथ शिंदे

eaknath shinde
आदित्य ठाकरे यांच्या जाहीर आव्हानानंतर थेट वरळीत सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या अनेक आरोपांना प्रत्युत्तर दिलं. एकनाथ शिंदेंनी मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार या विरोधकांच्या आरोपांवरही भाष्य केलं. तसेच कोळीवाड्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कामांचीही माहिती दिली. ते मंगळवारी (७ फेब्रुवारी) वरळीतील सभेत बोलत होते.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, “काही लोकं काय काय बोलत असतात. मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार आणि मुंबईकरांचं काय होणार असे जावईशोध हे लोक मुंबईची प्रत्येक निवडणूक आल्यावर लावतात. परंतु हा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो की, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी आहे. या मुंबई महाराष्ट्राची एक इंचही जागा कोणाला घेता येणार नाही आणि घेऊ देणार नाही.”
 
“जे जायला पाहिजे होतं, जे घालवायला पाहिजे होतं ते आम्ही सहा महिन्यांपूर्वीच घालून टाकलं. याचे आपण साक्षीदार आहात. त्यावेळचा काळ मला आठवतो. आम्ही गुवाहटीला होतो. काही लोक म्हणाले की, यायचं तर वरळीतून येऊन दाखवा, वरळीतून जाऊन दाखवा. हा एकनाथ शिंदे एकटाच आला आणि हेलिकॉप्टरने न जाता इथून रोडने गेला.
Edited by : Ratnadeep Ranshoor