बुधवार, 15 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 डिसेंबर 2024 (13:04 IST)

जेव्हा बाळा साहेबांनी गडकरींना वाईन ऑफर केली...

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मुलाखतीत बाळासाहेबांचा भन्नाट किस्सा सांगितला आहे. नितीन गडकरी यांनी अलीकडेच अनफिल्टर या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या दरम्यान त्यांनी अनेक जुन्या गोष्टींना उजाळा दिला. 
 
या मुलाखातीत त्यांना आपण नॉनव्हेज खाता का? अशा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की माझ्याजवळ बसून खात असले तरी मला काहीच हरकत नाही पण मी कधीच मासाहार केला नाही. यामागील धार्मिक कारण किंवा आरोग्यासंबंधी कारण आहे का विचारल्यावर ते म्हणाले की माझ्यावर लहानपणापासून आईने दिलेले संस्कार या कारणामुळे कधीच मी दारु पीत नाही आणि नॉनव्हेज ही खात नाही.
तेव्हा त्यांना विचारण्यात आले की कधी अटल बिहारी वाजपेयी किंवा बाळा साहेब यांनी त्यांना आग्रह केला नाही का? यावर त्यांनी मजेशीर किस्सा शेअर केला की एकदा मी रात्री बाळा साहेबांकडे गेलो होतो तेव्हा तिथे एक प्रसिद्ध वाईन कंपनीचे मालक देखील आलेले होते. त्यांनी स्पेशल वाईन आणली होती. तेव्हा बाळा साहेबांनी ग्लासमध्ये वाईन भरुन ऑफर केली तेव्हा मी म्हणालो की मी पीत नाही. मी कधी प्यायलो नाही मी तर लिंबू शरबत पिणार. तेव्हा त्यांनी वाईन कंपनीच्या मालकांना म्हटले की हा चड्डी छाप आहे, हा पीत नाही, हा शेण आणि गौमूत्र वाला आहे. त्यांच्या या बोलण्यावर आम्ही सर्व खळखळून हसू लागलो.
 
त्यांचा बोलण्याचा अंदाज काही वेगळाच असायचा. पण ते फार प्रेमाने वागायचे, त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते असे नितीन गडकरी म्हणाले.