सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (15:28 IST)

जिथे जिथे सनातनचे लोक असतील, अशा या संस्था असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा : भुजबळ

आदित्य ठाकरेंच्या धमकी प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी सनातनवर गंभीर आरोप केलेत. धमकी आली म्हणून कर्नाटक पोलिसांनी गप्प बसू नये. धमकी आल्यावर कडक कारवाई व्हावी. सनातन हा प्रॉब्लेम नव्हे, महाभयंकर प्रॉब्लेम आहे. सनातनसारख्या संस्थांवरती बंदी घालायला हवी. तिथे जशी कारवाई झाली, तशी महाराष्ट्रातसुद्धा जिथे जिथे सनातनचे लोक असतील, अशा या संस्था असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, असंही छगन भुजबळ म्हणालेत.
 
विशेष म्हणजे छगन भुजबळांच्या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही उत्तर दिलंय. सनातनवर बंदी घालण्याबाबत 2012 ला पहिल्यांदा प्रस्ताव आला. आघाडी सरकार सनातनविरोधात ठोस प्रस्ताव देऊ शकलेलं नाही. ठोस पुरावे असल्यास राज्यानं बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांकडे विधानसभेचं लक्ष वेधलं.