सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जुलै 2024 (09:43 IST)

नागपुरात वाढदिवसाच्या पार्टीवरून परतताना गाडी रेलिंगला धडकली,दोघांचा मृत्यू,तीन जखमी

नागपुरात पुन्हा वेगाने येणाऱ्या कारचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
मंगळवारी सकाळी कोराडी परिसरात वेगाने येणारी कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला कठड्याला जाऊन धडकली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. आणि तीन जखमी झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, कार मधील सर्व जण एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीतून परतताना त्यांची वेगाने धावणारी कार कोराडीच्या पांजरा परिसरात बीएसएनएल कार्यालयाजवळ कठड्याला जाऊन धडकली कार जय नावाचा तरुण चालवत होता. कठड्याला धडकून कार पालटली. 

या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात विक्रम उर्फ आयुष मधुकर गाडे, आदित्य प्रमोद पुन्नरवार हे दोघे मृत्युमुखी झाले तर जय गणेश भोंगडे,सुजल प्रमोद चव्हाण, सुजल राजेश मनवतकर गंभीर जखमी झाले आहे. 

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची नोंद घेतली असून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 

Edited by - Priya Dixit