रविवार, 3 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

सुप्रिया सुळे कोण आहेत? त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे ?

supriya sule
Who is Supriya Sule राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्यातील दिग्गज नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष पदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्ती घेतली आणि राज्यात राजकीय भूकंप झाला, त्यांच्या नंतर कोण असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा  सुप्रिया सुळे व अजित पवार यांचे नाव येतेय, तर सुप्रिया सुळे कोण आहेत (Who is Supriya Sule), त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.
 
सुप्रियाताई सुळे एक भारतीय राजकारणी आहेत, त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत.
 
सुळेताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या कन्या असून गेले अनेक वर्षे त्या राजकारणात सक्रीय आहेत.
 
२०११ मध्ये त्यांनी स्त्री भ्रूणहत्येविरूद्ध राज्यव्यापी मोहीम राबविली.
 
आज आपण सुप्रियाताई सुळे यांची माहिती जाणून घेऊया, त्यांचा जन्म  कुठे झाला? त्यांचे कुटुंब ? त्यांचे शिक्षण ? या सर्व गोष्टी खाली दिलेल्या माहितीवरून तुमच्या लक्षात येतील.
 
सुप्रियाताई सुळे यांचे जीवनचरित्र
पूर्ण नाव   सुप्रिया शरद पवार
अन्य नाव सुप्रिया सदानंद सुळे (लग्नानंतर)
जन्म  ३० जून १९६९
जन्मस्थान पुणे, महाराष्ट्र, भारत
वय (Age) वय ५३ वर्ष (२०२३ पर्यंत)
 
वडिलांचे नाव शरद पवारसाहेब
आईचे नाव प्रतिभा पवार
भाऊ-बहीण अजित पवार
पतीचे नाव सदानंद भालचंद्र सुले
कन्या रेवती सुले
पुत्र विजय सुले

शिक्षण : कैलिफोर्निया विश्वविद्यालय, बर्कले, जय हिंद कॉलेज
कार्यक्षेत्र : राजकारणी
राजकीय पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
भाषा : मराठी, हिंदी,इंग्लिश
राष्ट्रीयत्व / नागरिकत्व : भारतीय

सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती, शिक्षण
सुप्रिया सुळे यांचा जन्म सोमवारी, ३० जून १९६९ पूना, महाराष्ट्र (सध्याचे पुणे) येथे झाला. त्यांची राशी कर्क आहे.
 
त्यांनी पुण्याचे सेंट कोलंबस स्कूल येथून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात जय हिंद महाविद्यालयातून मुंबई, महाराष्ट्र बी.एस.सी. पूर्ण केली.
 
पुढे त्यांनी वॉटर पुल्लूशन या विषयात कॅलिफोर्निया, बर्कले विद्यापीठातून मास्टर डिग्री पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मुंबईला परतण्यापूर्वी इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहिली.
 
कुटुंब आणि वैवाहिक जीवन
सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवारसाहेब हे दिग्गज राजकारणी आणि राष्ट्रवादीचे संस्थापक आहेत.
त्यांच्या आईचे नाव प्रतिभा पवार आहे. त्यांचा चुलत भाऊ, अजित पवार हे एक प्रख्यात भारतीय राजकारणीही आहेत.
त्यांनी सुदानंद सुळे यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना रेवती सुळे आणि विजय सुळे असे दोन मुले आहेत.
 
सुप्रियाताई सुळे राजकीय कारकीर्द
सुप्रिया सुळे २००६ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. २००९ मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढविली आणि ३.३६ लाख मतांनी विजय मिळविला.
पुढे त्यांनी १० जून २०१२ रोजी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १२ व्या स्थापना दिवसानिमित्त, त्यांनी तरुण मुलींना राजकारणात येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबईत “राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस” सुरू केली.
 
२०१४ आणि २०१९ मध्ये त्या महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर पुन्हा निवडून आल्या.
 
सुप्रियाताई सुळे यांना मिळालेले पुरस्कार
समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ऑल लेडीज लीगने मुंबई वुमन ऑफ द डिकेड अचीवर्स अवॉर्ड देऊन गौरविले आहे.
 
सुप्रिया सुळेंची राजकीय कारकीर्द पाहिली तर आपल्याला समजते की, सुप्रिया सुळे २००६ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. आणि त्यानंतर त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून २००९ मध्ये ३.३६ लाख मतांनी विजयी झाल्या होत्या.
 
एवढेच काय तर त्यांच्या कार्यामुळे आणि खंबीर नेतृत्वामुळे त्या २०१४ आणि २०१९ मध्येही बारामती लोकसभा मतदार संघातून लोकसभेवर निवडून आल्या. १६व्या लोकसभेत सुप्रिया सुळे या संसदेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या होत्या. त्यांनी पाच वर्षांत संसदेत ११७६ प्रश्न विचारले होते.
 
२०११ मध्ये त्यांनी स्त्री भ्रूणहत्येविरूद्ध राज्यव्यापी मोहीम राबविली होती. १० जून २०१२ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १२ व्या वर्धापन दिवसानिमित्त तरुणींना राजकारणात येण्याची आवड निर्माण होण्यासाठी मुंबईत “राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस” नावाच व्यासपीठ सुरू करून तरुणींना राजकारणात येण्याचे आव्हाहन सुप्रिया सुळेंनी केले होते.
 
अशा या धाडसी आणि कार्यकुशल सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून महिलांची बाजू सरकारसमोर मंडण्याचा आणि समाजातील अनेक प्रश्न सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.
 
सुप्रियताईंनी कधीही व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारणातील ‘पवार’ या नावाचा वापर करून उपयोग किंवा गैरफायदा करून घेतला नाही. तर याउलट त्यांनी जी काही राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवली ती स्वतःच्या हिमतीवर मिळवली.
 
या संपूर्ण प्रवासात सुप्रिया सुळेंच्या मागे जसे प्रतिभा पवार आणि शरद पवार खंबीरपणे उभे होते तसेच त्यांच्या पाठीमागे आजून एक अदृश्य चेहरा अर्थात त्यांचे पती सदानंद सुळेंही खंबीरपणे उभे होते.

Edited by: Ratnadeep Ranshoor