सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 जून 2022 (14:54 IST)

नांदेड बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येमागे पत्नीचा हात?

murder
नांदेड  येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबातील वाद उफाळून आला आहे. त्यांच्या हत्येनंतर कौटुंबिक कलह निर्माण झाला असून, संजय बियाणी यांच्या पत्नी आणि दिरांनी एकमेकांविरुद्ध पोलिस तक्रार केली आहे. संजय बियाणी यांच्या पत्नीने जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार भावाने केली आहे. तर भावाने चोरी केल्याची तक्रार संजय बियाणी यांच्या पत्नीने केली आहे.
 
नांदेड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल रोजी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या झाली होती. ही हत्या खंडणीच्या वसुलीतून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. गाडीतून उतरताना त्यांच्यावर दुचाकीवरून येणाऱ्या दोन संशयितांनी गोळ्या झाडल्या होत्या. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. संजय बियाणी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. दोन महिन्यांनंतर या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी ९ जणांना अटक केली आहे. त्यानंतर कुटुंबीयांमधील कलह समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
 
दिवंगत संजय बियाणी यांच्या पत्नीने रविवारी (५ जून) रोजी सायंकाळी पोलिसांत जाऊन संजय यांचे भाऊ प्रवीण बियाणी यांनी फायनान्स कंपनीचा डाटा चोरला असल्याची तक्रार केली. वहिनीने तक्रार केल्यानंतर पाठोपाठ दिरानेही पोलिसांत धाव घेतली. संजय यांच्या पत्नीने आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार प्रवीण यांनी केली आहे. परस्परविरोधी तक्रारी केल्यामुळे बियाणी कुटुंबातील कलह समोर आला आहे.