गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (16:24 IST)

Indurikar Maharaj इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार?

indorikar maharaj
Supreme Court On Indurikar Maharaj : महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने इंदुरीकर महाराजांना मोठा दणका दिला आहे. त्यामुळं आता इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
 
Supreme Court On Indurikar Maharaj : महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. कारण सुप्रीम कोर्टाने इंदुरीकर महाराज यांना दिलासा देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने कायम ठेवत इंदुरीकर महाराज यांना मोठा दणका दिला आहे. त्यामुळं आता पुढील काही तासांत इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातूनही दिलासा न मिळाल्याने इंदुरीकर महाराजांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिर्डी येथील कार्यक्रमात बोलताना इंदुरीकर महाराज यांनी महिलांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.