बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 4 सप्टेंबर 2022 (10:20 IST)

अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट होणार?

amit shah
मनसे आणि भाजपच्या युतीची घोषणा होणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक भाजपाच्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात भेट होणार का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ही भेट होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
 
अमित शाह मुंबईत गणेशोत्सवासाठी येणार असून भाजपाच्या एका बैठकीला ते उपस्थित राहणार आहे. याशिवाय त्यांचे कोणतेही कार्यक्रम मुंबईत नियोजित नाहीत असं फडणवीस म्हणाले आहेत.