1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (08:03 IST)

करुणा शर्मां धनंजय मुंडे विरोधात निवडणूक लढवणार?

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे करुणा शर्मा यांच्या आरोपामुळे अडचणीत आले होते. आता त्याच करुणा शर्मा यांनी राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. करुणा या आता सक्रीय राजकारणात आल्या आहेत.
पक्षाची घोषणा करताना आपण राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आगामी निवडणूक लढविणार आहोत, असेही जाहीर केले. राष्ट्रवादीचे नेते  धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे चर्चेत आलेल्या करुणा  शर्मा यांनी अहमदनगर येथे नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. ‘शिवशक्ती सेना’ असे त्यांच्या नव्या राजकीय पक्षाचे नाव आहे.  पक्षाची घोषणा केल्यानंतर त्यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काही मंत्र्यांच्या बायकांनीही माझ्याशी संपर्क केला आहे. त्यांनी माझ्या राजकीय पक्षाला पाठिंबा दिला आहे.  करुणा शर्मा म्हणाल्या, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सोबत घेऊन आपण पक्ष स्थापन केला आहे. ‘शिवशक्ती सेना’ या नवीन पक्षासोबत अनेक जोडले जातील.
लवकरच अहमदनगरमध्ये सभा घेऊन पक्ष स्थापन करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली होती. अनेक पक्षांनी मला आपल्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले. मात्र मी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.