रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (12:19 IST)

हिंगोली जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

lightning
सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने झडी लावली असून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात हिवरखेडा साखरा परिसरात पावसाने हाहाकार माजवला असून वीज पडून एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे. 

तर पन्नास हेकटरवरील शेतीत कापूस, उडीद, मूग, सोयाबीनच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली असून साखरा शिवारात शेतात पतीसोबत काम करणाऱ्या शेतकरी महिलेवर वीज कोसळून तिचा जागीच दुर्देवी अंत झाला.तर महिलेचा पती गंभीर भाजला आहे.त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी महिलेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. 
Edited by - Priya Dixit