बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 जुलै 2024 (17:08 IST)

पुरामुळे कोल्हापूर सांगलीत स्थिती गंभीर नद्यांच्या पातळीत वाढ

floods
सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण्याच्या पाण्याच्या विसर्ग सुरु आहे. पिके पाण्याखाली गेली आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली असून कोल्हापूर जिल्ह्यात स्थिती गंभीर आहे. 

कोयना धरणातून पाणी सोडले जात आहे. कोयना व कृष्णा नदीपात्रात वाढ झाली असून शिरोळ तालुक्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे. 70 हुन अधिक गावाशी संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांना ग्रामीण भागातुन स्थानांतर केले जात आहे. राधानगरी धरणातील चार दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अनेक गाव आर्थिक नुकसानाला समोरी जात आहे.  
 
सांगली जिल्ह्यात पाण्याचा जोर ओसरला आहे. नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगलीत नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वारणा नदीच्या पाण्यातील वाढ कायम आहे. कृष्णा नदीच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. 

जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातून ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांची सोय निवारा केंद्र, माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळेत सोय केली आहे. दोन हजाराहून अधिक पशुधन सुरक्षितपणे सुरक्षितस्थळी स्थानांतरित करण्यात आले आहे. 
Edited by - Priya Dixit