गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जून 2024 (08:56 IST)

कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकमची गळफास घेऊन आत्महत्या

death
सांगलीतील युवा पैलवान सुरज निकमने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुमार महाराष्ट्र केसरी पैलवानचा खिताब मिळालेले सुरज निकमच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. 

कुमार केसरी होण्याचा मान मिळवणारे सूरज निकम यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. 
पैलवान सुरज निकम ने आज दुपारी 1 वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नातेवाईकांना त्याने गळफास घेण्याचे समजले. त्याच्या मामांनी त्याला रुग्णालयात नेले.आधी सुरजच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे सुरज व्यथित झाला.या घटनेमुळे कुस्ती विश्वात शोककळा पसरली आहे. 
 
दीड महिन्यापूर्वी विवाह झाला होता.त्यांच्या पश्वात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. सुरज निकम हा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात नागेवाडी गावातील रहिवासी आहे. कुमार महाराष्ट्र केसरी हा 'किताब ही त्याने जिंकला.
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून शनिवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

Edited by - Priya Dixit