शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जून 2024 (10:24 IST)

लिफ्टमध्ये महिला डॉक्टरचा डिलिव्हरी बॉयने केला विनयभंग

Crime
महाराष्ट्रातील कल्याण मध्ये एक हैराण करणारी बातमी समोर आहे. झोमॅटोच्या एका डिलिवरी बॉय ने एका इमारतीच्या लिफ्ट मध्ये महिला डॉकटरसोबत अश्लील वर्तणूक केली. यानंतर महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच चौकशी सुरु केली. व आरोपीला ताब्यात घेतले. 
 
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्व च्या पांजुरंग वाड़ी मध्ये  यशवंत धोत्रे नावाचा एक व्यक्ती राहतो. जो झोमॅटो कंपनीमध्ये डिलिवरी बॉय चे काम करतो. काळ संध्याकाळी तो एका इमारतीच्या  सहाव्या मजल्यावर पार्सल देण्यासाठी गेला होता. याचा दरम्यान एक महिला डॉक्टर इमारतीच्या सातव्या मजल्यावर फिजियोथेरेपीसाठी गेली होती. महिला डॉक्टर लिफ्ट मधून खाली उतरत होती. तेव्हा हा  डिलीवरी बॉय ज्याचे नाव यशवंत धोत्रे आहे, तो लिफ्टची वाट पाहत होता. तसेच लिफ्ट आल्यावर चढला. लिफ्ट जशी ग्राउंड फ्लोरसाठी  सुरु झाली, या व्यक्तीने महिला डॉक्टरसोबत अश्लील वर्तणूक केली. लिफ्ट थांबल्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो फरार झाला.  
 
यानंतर महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहों झोमॅटोशी चर्चा केली. यानंतर आरोपीची माहिती मिळताच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.