मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (11:37 IST)

गर्भवती पत्नीसह अमानवीय कृत्य केल्याने, महिलेने गमावले बाळ

कोल्हापूरच्या इचलकरंजी येथे एका तरुणाने अमानवीय कृत्य केल्याने त्याच्या गरोदर पत्नीला आपले बाळ गमवावे लागले. या तरुणाने आपल्या पत्नीला कौटुंबिक वादातून मारहाण केल्यामुळे पत्नीचा गर्भपात झाल्याचे वृत्त मिळाले आहे. यासीन मन्सूर नदाफ(26) असे या  आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी यासिन हा इचलकरंजी येथील आसरा नगर येथे आपल्या पत्नी मुबीना नदाफ सह राहतो.या दोघांमध्ये माहेरून पैसे आणायच्या वादातून वाद होत होते. आरोपी यासिन मुबिनाचा शारीरिक आणि मानसिक छळ  करायचा. तिला मारहाण करायचा. तिच्या आई आणि भावाला ठार मारण्याची धमकी द्यायचा. या दोघांमध्ये हा कौटुंबिक वाद 2017 पासून सुरु आहे. या दोघांमध्ये 22 डिसेंबर रोजी देखील वाद सुरु झाला आणि यासीन ने मुबीनाला रागाच्या भरात येऊन लाथा बुक्क्याने मारहाण करायला सुरु केले. एवढेच नाही तर तिला कंबर पट्ट्याने मारायला सुरु केले. मारहाणीत तो हे देखील विसरला की त्याची पत्नी मुबीना गरोदर आहे. त्याने केलेल्या बेदम मारहाणीमुळे मुबिनाचे पोट दुखू लागले आणि  तिचा गर्भपात झाला. पीडितेने पतीच्या जाचाला कंटाळून गावातील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करून घटनेचा तपास करत आहे.