मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (11:13 IST)

हृदयद्रावक ! विषबाधेने दोन सख्य्या बहिणींचा दुर्देवी मृत्यू

Heartbreaking! Tragic death of two sisters due to poisoning  हृदयद्रावक ! विषबाधेने दोन सख्य्या बहिणींचा दुर्देवी मृत्यूMarathi Regional News IN Webdunia Marathi
मरवडे तालुका मंगळवेढ्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे .इथे दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा खाऊ खाऊन  विषबाधा होऊन दुर्देवी अंत झाला आहे. भक्ती आबासाहेब चव्हाण वय वर्ष 6 आणि नम्रता आबासाहेब चव्हाण वय वर्षे 4 असे या मयत बहिणींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , मरवडे  गावातील आबासाहेब यांनी मंगळवेढाच्या एका  दुकानातून आपल्या दोघी मुलींसाठी खाऊ आणला होता. हे खाल्यावर घरातील प्रत्येकाला त्रास होऊ लागला. त्यांना मंगळवेढा आणि पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले .उपचारादरम्यान आबासाहेब यांची मोठी मुलगी भक्ती हिचा गुरुवारी मृत्यू  झाला. तर धाकटी मुलगी नम्रता हिचा देखील गुरुवारच्या मध्यरात्री मृत्यू झाला. मयत मुलींच्या आई-वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दोघींवर 
एकत्रच मरवडेच्या समशानभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघी बहिणी खूप प्रेमळ हुशार आणि लागवी होत्या. एकाच कुटुंबातील दोघी मुलींच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. मंगळवेढा पोलिसांनी प्रकरण नोंदवून पुढील तपास  करत आहे .