नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार, आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
तरुण आयपीएस अधिकाऱ्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आल्यावर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तरुणीने इमामबाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अधिकाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून बराच काळ तिचे लैंगिक शोषण केले. आरोपी 2021 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. 28 वर्षीय पीडित महिला डॉक्टर आहे आणि नागपूरमध्ये शिकवत होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या चुलत बहिणीला देखील आरोपी बनवले आहे.
आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख 3 वर्षांपूर्वी सोशलमिडीयाच्या एका प्लॅटफॉर्म वर झाली. त्यावेळी पीडित एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. तर आरोपी यूपीएससीची तयारी करत होता. नंतर त्यांची ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतरण झाले. आरोपी तरुणीला एका हॉटेलात घेऊन गेला आणि तिच्याशी लैंगिक सुखाची मागणी केली.
पीडित तरुणीने नकार दिल्यावर लग्नाचे आश्वासन देऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान आरोपीच्या आईचे निधन झाले. तो तिला घेऊन केरळच्या सहलीला गेला आणि पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.
आरोपी पीडितेला स्वतःच्या चुलत बहिणीकडे घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार करायचा.
पीडितेने आरोपीवर लग्नासाठी दबाब आणल्यावर त्याने जातीचे कारण देत लग्नासाठी नकार दिला. आरोपीने पीडितेला शिवीगाळ केली. पीडितेने आरोपीच्या चुलत बहिणीकडे मदत मागितल्यावर तिने देखील आक्षेपार्ह वक्तव्य दिले. अखेर पीडितेने इमामबाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Edited By - Priya Dixit