1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अबब! ब्रा घातली नाही म्हणून नोकरीवरून काढले

Woman 'sacked for not wearing bra' working in Beverley pub
लंडन- पश्चिम देशातील काही नियम इतके विचित्र आहे की अनेक व्यक्ती यामुळे डिप्रेशनमध्ये जातात किंवा आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन बसतात. ब्रिटनमध्ये नोकरी वरून काढण्याची एक विचित्र घटना समोर आली आहे.
 
काय आपण विचार करू शकता की ब्रा घालून कामावर न आल्यामुळे नोकरीवरून काढले जाऊ शकतं? परंतू ब्रिटनमध्ये एका मुलीला या घटनेचा समोरा जावे लागले. एका बारमध्ये काम करणारी 22 वर्षीय केट हनाह हिने दावा केला की ब्रा न घातल्यामुळे तिच्यावर आक्षेपार्ह करत काम वरून काढण्यात आले.
 
केटने आपल्यासोबत झालेल्या दुर्व्यवहाराची माहिती फेसबुकवरही पोस्ट केली होती. केट ने पोस्टमध्ये ग्रे क्रू नेक पी टीशर्ट घातलेला फोटोही अपलोड केला होता ज्यावर तिच्या बॉसने आपत्ती घेतली होती. फेसबुक पोस्टमध्ये तिने लिहिले होते यॉर्कशायरच्या एका पब बर्ड अँड बियर मध्ये ती टीशर्ट घालून गेल्यावर बॉसच्या भावाने टीका केली होती. सोशल मीडियावर हे जाहीर केल्यावर कायदेशीर कारवाईची धमकीदेखील दिली.
 
केटने सांगितले की मला नोकरीतून काढले कारण मी ब्रा घालायला नकार दिले होते. माझ्या मॅनेजरच्या भावाने माझ्यावर आक्षेपार्ह टीका केली. ज्यामुळे मी शॉक झाले. हे सर्व घडताना माझी बॉस तिथेच होती परंतू तिने आपल्या भावाची बाजू घेतली आणि मला ब्रा घातल्याशिवाय कामावर येयचे नव्हते असे तीन स्टाफ मेंबर्ससमोर बोलली.
 
केट म्हणाली यामुळे मला माझ्या शरीराची लाज वाटू लागली, माझ्यासोबत झालेल्या छेडछाडसाठी मला आणि माझ्या टॉपला दोषी ठरवण्यात आले. ब्रा घातली नाही म्हणून त्यांनी मला मूर्ख म्हणून थट्टा केली. काही कर्मचार्‍यांप्रमाणे युनिफॉर्मचे पालन करणे योग्य आहे तर काही कर्मचारी या विरोधात ब्रा-लेस प्रोटेस्ट करण्याच्या तयारीत आहे.