Festival Posters
✕

ठाकरे गट फोडण्यामागे तुम्ही आहात, तुम्ही भांडण लावलं : भुजबळ

Updated: शनिवार, 8 एप्रिल 2023 (21:49 IST)
 
भुजबळ म्हणाले की, "शिवसेना फुटली, या फुटीमागे कुणाचा हात आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. दोन भावांमध्ये आम्ही नाही तर तुम्ही भांडण लावलं. अन् हे भाडं कुणी लावलं, हे देखील सर्वांना माहित आहे. असे काम पवार करत नाहीत.
 
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, "शरद पवार आज नाशिकमध्ये येत असून इंडियन प्रेस मजदूर संघांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. या दौऱ्यात कुठल्याही प्रकारच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार नाही. त्याचबरोबर देवळाली मतदारसंघात  काही कार्यक्रम आहेत. निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या दौऱ्यात निवडणुकांची काही चर्चा होणार नाही." 
 
हिंडेनबर्ग या मुद्द्यावर भुजबळ म्हणाले की, "आपण आपल्या देशातील उद्योगपतींचे खच्चीकरण करु नये, आपली बदनामी होता कामा नये. टाटा, बिर्ला यांनी देखील खूप चांगले काम केले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, उद्योगपतींच्या बाबतीत कुठपर्यंत ताणून धरायचे? देशासह राज्यात इतर ही अनेक मुद्दे असून यावर चर्चा झाली नाही. मात्र काही लोकांना टार्गेट करण्यात आले. त्यांचे मत कुणाला पटेल, कुणाला पटणार नाही."
 
यावेळी भुजबळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत म्हणाले की, "भक्तिभावाने मुख्यमंत्री शिंदे यांनी अयोध्याला जावे, राजकारण करु नये. जनसेवा हीच ईश्वर सेवा असून शिंदेंवर फार मोठी जबाबदारी पडली आहे. मात्र दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार अजून होत नसल्याने अनेक नेत्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले की, "अशा परिस्थितीत केसरकर यांच्या वक्तव्याला महत्त्व नाही. फडतूस, काडतूस असे वक्तव्य होत आहे. त्यामुळे पुन्हा शिवसेना (ठाकरे गट) युती होईल असे वाटत नाही." दुसरीकडे अजित पवार नॉट रिचेबल आहेत यावर ते म्हणाले की, "अचानक आजारी असल्याने अजित पवार यांनी दौरा रद्द केला. त्यांनी सांगितले आहे की मला त्रास झाल्याने दौरा रद्द करत आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

टीम इंडियाने १९ वर्षांखालील आशिया कपचे विजेतेपद पटकावले

पंजाबमध्ये दोन बसची धडक, चार जणांचा मृत्यू १८ हून अधिक जखमी

LIVE: मुंबई ते कोकण प्रवास होणार आणखी सोपा! लवकरच नियमित विमानसेवा सुरू होणार

तुरुंगात शिवसेना नेते रमेश म्हात्रे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात उपचार सुरू

Next-Gen Hyundai Creta हायब्रिड इंजिन आणि व्हेंटिलेटेड सीट्ससह नवी ह्युंदाई क्रेटा! पहिली झलक समोर

पुढील लेख
Show comments