शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2023 (21:38 IST)

प्रियकराने प्रेयसीच्या मुलाला केली मारहाण, बालकाचा मृत्यू

death
नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथे प्रियकराने प्रेयसीच्या मुलाला केलेल्या मारहाणीत चार वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कृष्णा असे मृत बालकाचे नाव आहे. कृष्णाने शर्ट उलटा घातल्याची कुरापत काढत प्रियकराने काठीने मारहाण केली. यात कृष्णाच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
 
निफाडमधील बोकडदरा येथून प्रियकर गणेश उर्फ अमोल नाना माळी व प्रेयसी काजल सिन्नर येथे पळून आले होते. हे दोघे पंधरा दिवसांपासून गुळवंच येथे संपत कांगणे या शेतकऱ्याकडे कामास होते. या ठिकाणीच किरकोळ कारणाने चार वर्षीय बालकाला काठी मारल्यामुळे मृत्यू झाला. ही काठी मारल्यानंतर या दोघांनी कृष्णाला खासगी रुग्णालयात नेले होते. पण, येथे डॅाक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात नेण्याचे सांगितले. येथे नेल्यानंतर बालक मृत असल्याचे सांगितले. त्यानंतर अमोल माळी याने येथून पळ काढला.
 
दरम्यान या सर्व घटनेची माहिती डॉक्टरांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. येथे आई काजल हिने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलीस निरीक्षक शामराव निकम यांनी संशयित आरोपीला अवघ्या २४ तासात गजाआड केले.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor