1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2023 (17:24 IST)

तीन दहशतवादी दुबईमार्गे मुंबईत,अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षात फोन केला ,शोध मोहीम सुरु

Three terrorists in Mumbai via Dubai unknown person called police control room search operation started
26/11च्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत दहशत माजवण्याचा कट दहशतवादी रचत आहेत. वास्तविक, तीन पाकिस्तानी दहशतवादी दुबईमार्गे मुंबईत घुसल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.  

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी तीन दहशतवादी शहरात खुलेआम फिरत असल्याची माहिती मिळाली. फोन करणार्‍याने सांगितले की, पाकिस्तानातील तीन दहशतवादी शुक्रवारी सकाळी दुबईमार्गे मुंबईत पोहोचले आहेत. यावेळी कॉलरची ओळख पटलेली नाही.
 
अज्ञात कॉलरने एका दहशतवाद्याची ओळखही उघड केली आहे. दहशतवादी मुजीब सय्यद नाव सांगितले. तसेच त्याचा फोन नंबर आणि गांडी नंबरची माहिती दिली. यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, ही माहिती खोटी असल्याचा संशय या घटनेशी संबंधित अधिकाऱ्यांना आहे. पोलिस फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत. 
 
मुंबईत यापूर्वीही 26 नोव्हेंबर 2008 रोजी सागरी मार्गाने पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. 29 नोव्हेंबर रोजी हल्ला थांबला. यादरम्यान 166 जणांचा मृत्यू झाला, तर 300 जण जखमी झाले. या घटनेत भारतीय सुरक्षा दलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जवानांनी नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी होता जो जिवंत पकडला गेला होता आणि 21 नोव्हेंबर 2012 रोजी त्याला फाशी देण्यात आली होती.
 
Edited By - Priya Dixit