रविवार, 21 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (14:54 IST)

गांजाच्या नशेत तरुणाचा दगडाने ठेचून खून; चौघांना अटक

murder
कोल्हापूर : पूर्व वैमानस्यातून गांजाच्या नशेत दगडाने ठेचून ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (वय- २५, पाचवा बस स्टॉप, फुलेवाडी) या तरुणाचा  रात्री खून झाला होता. या प्रकरणाचा 24 तासात उलगडा करण्यात करवीर पोलिसांना यश आले.
 
वृषभ विजय साळोखे, सोहम संजय शेळके, गणेश येळगट्टी, अथर्व हावळ या चौघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रायगड कॉलनी नजीकच्या जगतापनगर ज्योतिर्लिंग शाळेमागील ओढ्याजवळच्या माळावर बुधवारी रात्री ही घटना घडली
 
Edited By- Ratnadeep Ranshoor