मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

जिल्हा काबीज करायला पक्ष तयार उपराजधानी नागपूर सोबत चार जिल्ह्यात जेडपीच्या निवडणुका

विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वात मोठ्या निवडणुका आहेत त्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या होय. ज्या पक्षाकडे जिल्हा परिषद त्याची त्या जिल्ह्यात सत्ता असे समीकरण असते, त्यामुळे आता जिल्हा जिंकायला सर्व पक्ष तयार असून, नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान; तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
 
श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या सर्व निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2019 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
 
निवडणूक कार्यक्रम
•     नामनिर्देशनपत्र सादर करणे- 18 ते 23 डिसेंबर 2019
•     नामनिर्देशनपत्रांची छाननी- 24 डिसेंबर 2019
•     अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019
•     अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 1 जानेवारी 2020
•     मतदानाचा दिनांक- 7 जानेवारी 2020
•     मतमोजणीचा दिनांक- 8 जानेवारी 2020