शनिवार, 1 एप्रिल 2023
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified सोमवार, 30 जानेवारी 2023 (12:00 IST)

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Birthday Wishes In Marathi

वाढदिवसाला वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान प्राप्त होवो
आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो
आपणास उदंड आयुष्य लाभो
वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा
 
जीवेत शरद: शतं 
पश्येत शरद: शतं 
भद्रेत शरद: शतं 
अभिष्टचिंतनम 
जन्मादिवसस्य शुभाशय: 
 
समुद्राचे सर्व मोती तुमच्या नशिबी यावे
तुझ्यावर प्रेम करणारे सर्वजण तुझ्या सोबत असावे
देवाकडे एवढीच प्रार्थना
तू नेहमी यशाचे शिखर गाठावे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
 
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
वर्षाचे ३६५ दिवस
महिन्याचे ३० दिवस
आठवड्याचे ७ दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुमचा वाढदिवस
वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
तुझा वाढदिवस
अनमोल असावा
जीवनाच्या शिंपल्यात
मोत्यापरी जपावा
इंद्रधनुचे सप्तरंग बहरत यावे
तुझ्या जीवनी
दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा
 
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा
 
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद असावा
यशाचा आलेख जीवनभर वाढतच जावा
हिच त्या ईश्वराकडे मनापासून प्रार्थना
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
 
वेळ चांगली असो वा वाईट
मला त्याची काळजी नसते
कारण माझ्या चेहऱ्यावर
आनंद आणण्यासाठी
तुझी एक गोडशी स्माईलच पुरेशी असते
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
 
तुम्हाला सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा