शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (16:13 IST)

Birthday Wishes in Marathi वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
 
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
 
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
 
येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि
तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य,
प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आयुष्याच्या या पायरीवर आपल्या
नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
 
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
 
लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे
वाढदिवसाच्या शुभेच्छा
 
वर्षाचे ३६५ दिवस
महिन्याचे ३० दिवस
आठवड्याचे ७ दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुमचा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
 
नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा!
 
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
 
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभु दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 
हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 
जगातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. 
असो..
रहस्य असंच कायम राहो 
आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा