गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (20:37 IST)

Friends with benefits असाल तर नातं चांगलं ठेवण्यासाठी 5 महत्त्वाच्या गोष्टी

Friends with benefits बदलत असलेल्या समाज आणि वातावरणासोबत मैत्री आणि नातेसंबंधांचे प्रकार आणि नावेही बदलली आहेत. सीरियस रिलेशनशिप ते कॅजुअल रिलेशन आणि कॅजुअल ते फ्रेंड्स विद बेनिफिट्स पर्यंतचा कॉन्सेप्ट समोर आहे. कोणतेही नाते वाईट नसतं फक्त आपल्या त्या नात्याची हद्द माहित असावी. अशात आपणही अशा कोणत्या नात्यात असाल ज्याला फ्रेंड्स विद बेनेफिट्स म्हटलं जातं तर आपण त्याच्या मर्यादा देखील समजून घेतल्या पाहिजेत अन्यथा ते आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
 
समजून घ्या काय आहे फ्रेंड्स विद बेनिफिट्स
कोणतेही बंधन नसल्यामुळे या प्रकारच्या नात्यात अडकणे सोपे आणि नैसर्गिक आहे. होय हे वन नाईट स्टँडपेक्षा वेगळे आहे, परंतु ते बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंडच्या नातेसंबंधापेक्षाही कमी आहे. एकूणच हे एक प्रकारचे नाते आहे जिथे संतुलन सर्वात महत्वाचे आहे. या नात्याचे अनेक फायदे आहेत, पण त्यात काही आव्हानेही आहेत. ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या समस्यांचे कारण बनू शकते. अशात हे महत्वाचे आहे की आपण या नात्यात या चुका टाळा.
 
फ्रेंड्स विद बेनिफिट्स असाल तर लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी
1 आपल्या हेतूंबद्दल प्रामाणिक रहा
हे नाते तेव्हाच चांगले काम करते जेव्हा दोन्ही पक्ष एकमेकांबद्दलचे त्यांचे हेतू स्पष्ट करतात. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीशी नातेसंबंधात असाल जो तुम्हाला आवडतो आणि तुम्ही त्याच्यासोबत दीर्घकालीन नातेसंबंधात राहण्याची अपेक्षा करत असाल, तर ते तुमच्या दोघांनाही त्रासदायक ठरेल. म्हणूनच तुम्ही दोघांनी तुमच्या अपेक्षा आणि हेतूंबद्दल सुरुवातीलाच प्रामाणिकपणे बोलले पाहिजे.
 
2 फ्रेंडशिप फर्स्ट
एफडब्ल्यूबी (FWB) व्यवस्था याचा अर्थ आहे की आपण दोघेही मित्र होणार आहात पण जेव्हा आपल्यामधून एकालाही त्याचे प्रेम भेटले आणि नातं संपण्याची वेळ आली तर आपण चांगले मित्र राहाल. म्हणूनच तुमच्या FWB रिलेशनशिप स्टेटस दरम्यान एक चांगला मित्र होण्यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून दोघांनाही मित्र राहणे सोपे जाईल.
 
3 अवास्तव अपेक्षा ठेवू नका
फक्त तुम्ही तुमच्या मित्रासोबत शारीरिक संबंध शेअर केल्यामुळे, याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी ते तुमच्यासाठी उपलब्ध असले पाहिजेत. संबंध काहीही असले तरी ते एकतर्फी नसतात हे लक्षात ठेवा. याव्यतिरिक्त जर तुम्हाला हे नाते अधिक प्रगती करण्याची आशा असेल तर ते आता संपवणे चांगले आहे.
 
4 अधिक इन्वॉल्व होऊ नये
फ्रेंड विद बेनिफिट यासह इन्वॉल्व होणे महागात पडतं. होय आपण दोघे ‍फ्रेंड्स आहात आणि याबद्दल भावान असण्याची परवानगी असते पण या भावान फ्रेंड्ससाठी असणार्‍या भावानांपेक्षा अधिक नसाव्यात. आपल्याला जोडीदाराबद्दल अधिक तीव्र भावना निर्माण होत असल्याचे आढळल्यास, एक पाऊल मागे घेणे, तुम्ही कुठे आहात हे शोधून काढणे आणि स्वतःला पुढे जाण्यापासून रोखणे शहाणपणाचे ठरेल.
 
5 तुम्ही रिलेशनशिपमध्ये असल्यासारखे वागू नका
आपण एफडब्ल्यूबी व्यवस्थेत आहात अशात जोडीदाराने आपल्यासोबत डॉक्टरकडे यावं किंवा कझिन्सचे लग्न अटेंड करावे अशी अपेक्षा करणे चूक आहे. या नात्यासाठी मर्यादा निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेणेकरून ते केवळ शारीरिक संबंधांपुरतेच मर्यादित राहावे आणि गंभीर नातेसंबंधापर्यंत पोहोचू नये.