Dharma Sangrah

नाती काय असतात?

Updated: बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (17:26 IST)
आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं,
आपल्या आवाजातील निनाद.
 
        ।।गुरुजन।।
आपल्या भविष्याचे शिल्पकार 
आपल्या जीवनाचा प्रकाश 
अज्ञान दूर करणारे वासरमणी 
मानवतेचे महादूत.
 
       ।।सासू - सासरे।।
आपल्याला जन्म न देणारे आईवडील ...
पदोपदी जन्मदांत्यांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप.
 
       ।।आत्या - मामा।।
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती.
 
             ।।मामा।।
मानवी जीवनाचं एक मनोरम नातं 
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो 
मा + मा = मामा, आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार.
 
            ।।मामी।।
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्ती 
शैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती.
 
             ।।दाजी।।
आपल्या आदर भावाचं शिखर 
आपले आदर्श , आपले जीवन दर्शक.
 
              ।।साडु।।
एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं. इस्टेटीत वाटा न मागणारा भाऊ....
 
          ।।मेहुणी।।
आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता, 
आपले सासरचे वास्तव्य रमणीय करणारी हर्षवर्धिनी.
 
    ।।मावस भाऊ - बहीण।।
बहीण भावाच्या नात्यातील प्रीतिचा बोनस, बहीण भावाची उणीव भरुन काढणारे समर्थ पर्याय.
 
   ।।मेव्हणा भाऊ - बहीण।।
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी, थट्टा मस्करीतून प्रीतीचा आविष्कार करणारे जीवलग.
 
         ।।भाचे - भाची।।
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे,
आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं.
 
            ।।पुत्र।।
भविष्याचा प्रकाश, अस्तित्वाचा अर्थ,
वंशाचा कुलदीपक,कुटुंबाचा उध्दारक 
म्हातारपणीची काठी.
 
         ।।मुलगी।।
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण,
मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी,
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक,
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा, जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती.
 
         ।।नातवंडे।।
 दुधावरली साय, आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा,
अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट.
 
         ।।मित्र मैत्री।।
ईश्वरी वरदान, रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं, विश्वासाची आधारशीला,  स्वतःचेच प्रतिरुप.
 
            ।।शेजार धर्म।।
मानवी मूल्यांचा ओझोन, संस्कृतीचा संधीप्रकाश, आपल्या  सौख्याचा आलेख टिपणारी स्पंदन.
 
           ।।शिष्य।।
आपल्या कर्तृत्वाचा कळस व 
आपल्या कौशल्याची किरणं.
 
खरंच माणुस नाते जपतो का ?
जो जपतो नात तोच खरा  माणुस .   
 नातं जोपासणारा माणूस जणू पिसारा फुलवलेला मोरच ! नाही का ?
 
नाते जपा.....नाते टिकवा........!
 
 
- सोशल मीडिया

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

Jyeshtha Gauri Pujan Images Wishes in Marathi ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा फोटो

ISRO Recruitment : ISRO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ITI उत्तीर्ण तरुणांसाठी भरती, ५ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज

पुढील लेख
Show comments