बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By

तुमचा मुलगा बोलतांना जास्त रागात असतो का ? या ट्रिक अवलंबवा

family
बऱ्याचदा  आई-वडील आणि मुलांचे विचार वेगवेगळे असतात. आणि यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण होतात. पालकांची समस्या असते की, मुले त्यांच्या दॄष्टिकोण समजून घेत नाही. व त्यांच्यासोबत वाद घालतात. जर तुमचे मुलं देखील असे करत असतील तर या ट्रिक अवलंबवा. 
 
सकरात्मक गप्पा करणे- तुम्हाला तुमच्या मुलांसमोर अश्या शब्दांचा उच्चार करणे टाळायचे आहे ज्यात असे वाटेल की तुम्ही स्वताचा बचाव करत आहात
 
सकरात्मक बोलणे- मुलांना रागवण्यापेक्षा त्यांना समजवा. तुमच्या मुलांवर प्रभाव पडेल. आणि ते काम करणे सुरु करतील.त्यांच्याशी नेहमी सकारात्मक बोला जेणे करून त्यांच्यावर चांगला प्रभाव पडेल.  
 
दोघांमध्ये विश्वास निर्माण करणे- सर्वात आधी तुमच्यात आणि मुलांमध्ये भावनिक पूल बनवा. तुम्ही आय कॉन्टैक्ट, डोके हलवून, हो आम्ही समजत आहोत. अशी प्रतिक्रिया दिल्यास मुलांना दाखवू शकतात की तुम्ही त्याचे म्हणणे ऐकून घेत आहात. यामुळे तुमचे प्रेम तुमच्या मुलांपर्यंत पोहचेल. यामुळे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये विश्वासचे नाते  निर्माण होईल. 
 
मुलांना विकल्प दया- पालकांची सवय असते की, ते मुलांना ऑर्डर देतात. मुलांना कमांड न देता तुम्ही त्यांना विकल्प दया. मुलांना खोली आत्ता स्वच्छ करा असे सांगण्यापेक्षा असे सांगा की खोली स्वच्छ करण्यासाठी तुमचा काय प्लान आहे? विकल्प दिल्याने मुले सशक्त होतात आणि त्यांना वाटते की निर्णय त्यांना स्वताला घ्यायचे आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik