शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Updated : मंगळवार, 31 मे 2022 (16:19 IST)

Relation Tips: लग्नानंतर माहेरची खूप आठवण येते, या टिप्स फॉलो करा

लग्नानंतर प्रत्येक मुलीचं आयुष्य बदलतं. ज्या घरात ती लहानाची मोठी होते त्या घराला तिला कायमचे सोडून लग्न झाल्यावर दुसऱ्या घरी जावे लागते.  तिला नवीन नातं नवे लोक, नव्या घरात जुळवून घ्यावे लागते. पण खरं तर तिला आपल्या आई-वडिलांना सोडून नवीन घरात जुळवून घेणं सोपं नसतं. नवीन घराचे वातावरण त्या घराच्या माणसांच्या स्वभावाला जुळवून घेणं सोपं नसतं. 

लग्नांनंतर नवीन वातावरण तिला सासरी जाऊन माहेरची आठवण येणं अपेक्षित आहे. आई अशी करते, बाबा असं म्हणतात, या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागतात. आपल्या माहेरच्या माणसांना आपल्या बहीण-भावंडाना सोडून आल्यामुळे तिला  होम सिकनेस होऊ लागतं. लग्नानंतर आपल्याला देखील माहेरची आठवण येत असल्यास या काही सोप्या टिप्स अवलंबू शकता. 
 
1 एकटे राहू नका-
लग्नानंतर नवी नवरी बहुतेक वेळा तिच्या खोलीतच राहते असे अनेकदा दिसून येते. तिला नवीन असल्यामुळे नवीन कुटुंबात कोणतीही जबाबदारी दिलेली नसते किंवा ती कुटुंबात पूर्णपणे मिसळलेली नसते. जेणेकरुन तिला त्या वातावरणात आरामदायी वाटेल. म्हणूनच तिला तिच्या खोलीत एकटे राहायला आवडते. पण जेव्हा ती एकटी असते तेव्हा तिला तिच्या माहेरची आईबाबांची जास्त आठवण येऊ लागते. अशा वेळी खोलीत एकटे न राहण्याचा प्रयत्न करा. सासू, नणंद किंवा सासरच्या मुलांसोबत वेळ घालवा. यामुळे तुमचं त्यांच्यासोबतचं नातंही घट्ट होईल आणि तुम्ही व्यस्त असल्यानं तुम्हाला माहेरची आठवण कमी येईल.
 
2 व्हिडीओ कॉलवर बोला-
तुम्हाला माहेरची आठवण येणं स्वाभाविक आहे. पण लग्नानंतर पुन्हा पुन्हा माहेरी जाणे टाळा, आठवण आल्यावर माहेरी फोन करून घरच्यांशी बोलू शकता. आता व्हिडिओ कॉलमुळे सर्व काही सोपे झाले आहे. तुम्ही तुमच्या पालकांना, भावंडांना व्हिडिओ कॉल करू शकता. यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत आहात असे तुम्हाला वाटेल.
 
3 तुमच्या आईच्या घरून ऑर्डर केलेले पदार्थ मागवा-
माहेरची आठवण येत असेल, तर आईच्या हाताने बनवलेले तुमच्या आवडीचे पदार्थ तुम्ही ऑर्डर करून मागवू  शकता. आईच्या हाताने बनवलेले लाडू, किंवा तुमचा आवडता पदार्थ, आईला तयार करायला सांगा आणि तुमच्यासाठी पाठवायला सांगा. तुमची आवडती डिश पाहून तुमचा मूड फ्रेश तर होईलच, शिवाय आईसोबत असल्यासारखे वाटेल. यामुळे तुमच्या माहेरच्या घराची आठवणही कमी होईल.
 
4 थोडावेळ माहेरी भेटायला जा-
जर तुम्हाला तुमच्या माहेरची खूप आठवण येत असेल आणि माहेर जवळ असेल तर तुम्ही एक-दोन तास तिथे जाऊन आई-बाबांची भेट घेऊ  शकता. काही काळ पतीसोबत माहेरी घरी जा आणि सर्वांना भेटा. कुटुंबीयांच्या भेटीनंतर तुम्हाला छान वाटेल. पण लक्षात ठेवा की दररोज किंवा नेहमी घरी जाण्याचा विचार करू नका. सासरच्या लोकांच्या सोयी लक्षात घेऊनच  माहेरी जा.