सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: सोमवार, 6 जून 2022 (23:34 IST)

या छोट्या गोष्टी घटस्फोटाला कारणीभूत ठरतात, या चुका करणे टाळा

लग्नानंतर प्रत्येकाचं आयुष्य बदलतं. आपले वैवाहिक जीवन चांगलं  व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. पण जर एखादे आपल्या नात्यात आंनदी नसतील तर त्यांच्यामध्ये घटस्फोट होण्याची शक्यता असते. घटस्फोटाचे अनेक कारणं असू शकतात. 

वैवाहिक जीवनात वाद होणं हे सहज आहे. प्रत्येक जोडप्यात वाद होतातच. पण प्रत्येक वाद विकोपाला जातात तेव्हा नात्यात दुरावा येतो आणि अशा परिस्थितीत ते एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतात. घटस्फोट होण्यामागची कारणे वेग-वेगळी होऊ शकतात. 
 
कधीकधी परिस्थिती देखील घटस्फोटाचे कारण असू शकते. जेव्हा जोडप्यांना असे वाटू लागते की त्यांनी आपल्या जोडीदारासाठी सर्व काही केले आहे परंतु तरीही त्यांच्यात काहीch बदल होत नाही, अशा परिस्थितीत लोक त्यांचे लग्न संपवण्याचा विचार करू लागतात. चला तर मग घटस्फोटाची कारणे जाणून घ्या. 
 
घटस्फोटामागे ही कारणे जबाबदार असतात -
 
1 एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर- जेव्हा एखादी व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असताना दुस-यासोबत संबंध ठेवते तेव्हा त्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणतात. अशा लोकांवर पुन्हा विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. अनेक घटस्फोटामागे विवाहबाह्य(एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर) संबंध हे सर्वात मोठे कारण आहे. 
 
2 आर्थिक समस्या- घटस्फोटाच्या अनेक प्रकरणांमध्ये पैसा हे देखील एक मोठे कारण आहे. दोन व्यक्तींपैकी एकाची कमाई कमी-जास्त झाली की समोरच्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो, त्यामुळे नात्यात अनेकदा दुरावा येतो. बऱ्याच वेळा एक व्यक्ती नात्यात खूप खर्चिक असते तर दुसरी व्यक्ती बचतीची जास्त काळजी घेणारी असते. अशा वेळी खर्चाचा ताळमेळ न राहिल्याने नात्यात दुरावा वाढू लागतो. 
 
3 संवादाची समस्या होणं - अनेक प्रकरणांमध्ये, घटस्फोटाचे एक कारण म्हणजे दोन व्यक्तींमध्ये खूप वादविवाद आणि एकमेकांशी त्यांच्या मनातले बोलू न शकणे. संवादाची ही समस्या घर, जबाबदारी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे देखील असू शकते. 
 
4 जास्त अपेक्षा - कोणत्याही नात्यात वेळ जास्त आला की लोक एकमेकांकडून अपेक्षा ठेवायला लागतात. कधी कधी अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे नात्यात कटुता निर्माण होते. आणि नात्यात दुरावा येऊ लागतो. घटस्फोटाचे हेही एक प्रमुख कारण आहे.  
 
5 सेल्फ रिस्पेक्ट- जेव्हा दोन लोक एकत्र राहू लागतात, तेव्हा ते सर्व प्रकारच्या गोष्टी, आनंद, दुःख शेअर करतात. यामुळे दोघेही एकमेकांसोबत एकदम मोकळे होतात. अशा स्थितीत अनेकदा एखादी व्यक्ती असे काही बोलते ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावते. अनेक वेळा पती किंवा सासरच्या मंडळींकडून वारंवार अपमान केल्यामुळे महिलांना असे निर्णय घ्यावे लागतात.  
 
6 कौटुंबिक जबाबदाऱ्या- अनेक जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे मुख्य कारण म्हणजे कौटुंबिक जबाबदाऱ्या आहे. पती-पत्नीशिवाय कुटुंबात मुलेही आहेत आणि पती-पत्नी दोघेही काम करत असताना त्यांना घराची साफसफाई, स्वयंपाक, मुलांची काळजी घेणे इत्यादी अनेक गोष्टी स्वतःच सांभाळाव्या लागतात. वेळी जबाबदाऱ्या एकत्र न घेतल्यास नात्यात कटुता निर्माण होते आणि अनेकदा प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते.