1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: बुधवार, 17 एप्रिल 2024 (06:36 IST)

राम- सीता यांच्या नात्यातून या 4 गोष्टी शिकाव्या, आयुष्य आनंदी होईल

ram sita
भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्यातील नाते युगानुयुगे स्मरणात राहील. भगवान श्रीरामांची एकच पत्नी आणि राणी होती, त्या माता सीता होत्या. माता सीता यांची पवित्रता आणि त्या एक आदर्श पत्नी असण्याची अनेक उदाहरणे राम चरित मानसमध्ये पाहायला मिळतात. माता सीता एक राजकुमारी होत्या, परंतु जेव्हा त्यांचे पती श्री राम वनवासात गेले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत 14 वर्षे जंगलात राहण्याचा निर्णय घेतला. सर्व दुःख सहन केले पण पतीला प्रत्येक पाऊलावर साथ दिली. भगवान रामाने पत्नी सीतेचे अपहरण केल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी लंकेवरही हल्ला केला. त्याच्यांकडे ना सैन्य होते ना राजेशाही पण त्यांनी वनवासात माता सीतेला रावणापासून वाचवण्यासाठी आपले सैन्य तयार केले. रावणाशी युद्ध झाल्यानंतर माता सीतेने अग्निपरीक्षा देऊन आपले पावित्र्य सिद्ध केले, तर अयोध्येला परतल्यानंतर राम आणि सीता पुन्हा विभक्त झाले तेव्हा त्यांचे एकमेकांवरील प्रेम कमी झाले नाही. जेव्हा माता सीता झोपडीत राहायला गेल्या तेव्हा रामजी राजवाड्यातच राहू लागले मात्र पुनर्विवाह न करता आणि सर्व सुख-सुविधांशिवाय. त्यामुळेच लोक अनेकदा म्हणतात की जोडी असेल तर राम सीतेसारखी असावी. तुम्हालाही राम आणि सीताप्रमाणे आदर्श पती-पत्नी म्हणून जगायचे असेल, तर त्यांच्या नात्यातून या चार सकारात्मक गोष्टी शिका.
 
प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना साथ द्या
प्रत्येक पती-पत्नीने राम आणि सीतेच्या नात्यातून एक धडा घेतला पाहिजे, तो म्हणजे प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना साथ देणे. माता सीतेने रामजींना वनवासात असताना साथ दिली आणि रावणाने पळवून नेल्यानंतरही माता सीतेला परत आणण्यात श्री राम अविचल राहिले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही दोघांनी एकमेकांवरचा विश्वास कायम ठेवला.
 
पैसा आणि पद नात्यात येऊ नये
प्रेम हे पद आणि पैशाच्या पलीकडे आहे. माता सीतेच्या स्वयंवरात थोर महारथी, राजे-महाराजांनी हजेरी लावली होती पण माता सीतेचा विवाह श्रीरामाशी झाला होता, जे आपल्या गुरूंसोबत तिथे पोहोचले होते. एक मुलगा जो राजाही झाला नव्हता आणि राजपुत्राच्या वेशात देखील नव्हता. तरीही माता सीतेने त्यांचा पती म्हणून स्वीकार केला. त्याच वेळी जेव्हा राम वनवासात गेले आणि संपूर्ण राज्य सोडून जावे लागले तेव्हा माता सीतेने आपल्या पतीच्या पदाचा आणि पैशाचा विचार न करता आणि सर्व सुख-सुविधा सोडून श्रीरामांसोबत वनवासात गेल्या.
 
एकमेकांप्रती निष्ठा
माता सीतेने आयुष्यभर पतीच्या भक्तीचा धर्म पाळला. रावणाने पळवून आणल्यानंतरही माता सीतेने आपल्यावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही आणि शेवटपर्यंत रावणापुढे झुकल्या नाहीत. दूर राहूनही माता सीतेने पत्नीच्या धर्मावर परिणाम होऊ दिला नाही. श्रीरामांनीही आपल्या पत्नीच्या अनुउपस्थितीत अश्वमेध यज्ञात आपल्या पत्नीची सोन्याची मूर्ती बनवून त्यांना आपल्याजवळ बसवले. राजा असूनही पत्नी सीता गेल्यानंतरही त्यांनी दुसरे लग्न केले नाही. दोघांमध्ये अंतर असूनही माता सीता आणि श्रीराम यांचे एकमेकांवरील प्रेम आणि त्यांचा वैवाहिक धर्म तसाच राहिला.
 
सुरक्षा आणि आदर
भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या नात्यात सुरक्षितता आणि आदर दोन्हीची भावना होती. माता सीतेच्या अपहरणानंतर, श्रीराम त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी लंकेच्या राजा रावणाशी युद्ध करण्यास तयार झाले. प्रत्येक पतीने आपल्या पत्नीच्या सुरक्षिततेची आणि आदराची काळजी घेतली पाहिजे. माता सीतेच्या चारित्र्यावर आणि पवित्रतेवर जेव्हा प्रश्न उपस्थित केले गेले, तेव्हा प्रभू रामांचा त्यांच्यावर विश्वास असूनही सीताजी आपल्या पतीच्या सन्मानासाठी अग्निपरीक्षेला सामोरा गेल्या.